राज्यामध्ये सत्तांतरझाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसारखा उत्तम प्रशासक या सरकारकडे असताना त्यांना दोन नंबरची जागा दिली गेलीय देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती होती,
पण भाजपने असा कसा निर्णय घेतला माहिती नाही.त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार लवकर स्थिर व्हावं आणि कामाला लागावं.त्यासोबतच देव - धर्म, पूजाअर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमून त्यांना एक खात द्यावं आणि बाकीच्यांनी कामाला लागावं असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुरात लगावला आहे.जयंत पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते.दरम्यान, जयंत पाटील यांनी देव - धर्म,पूजाअर्चा बाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.आणि त्यामुळे हिंदुत्ववादी मंडळींकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
#JayantPatil #EknathShinde #SharadPawar #ShivSena #NCP #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #ReligiousProcession #HWNews